Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मनापल्याडच्या गावात

January 12, 2015

मनापल्याडच्या गावात
कविता फुलत असते
भावनांच्या हिंदोळ्यावर
अल्वार झुलत असते

मनाच्या राज्यात मात्र
गंधविरहीत अबोली
भावशून्य चेह-याची
नित्य शब्द हरवलेली

'त्या' गावातून कधीतरी
मी शब्द खुडून आणते
दरवळणारी कविता
चिमटीत पकडून आणते

पण मन मात्र तरीही
शांत आणि निर्विकार..
म्हणतं, आताशा मला
जमू लागलाय व्यवहार !

- अनुराधा म्हापणकर

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 7940 hits