Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ती.........

January 13, 2016

Search by Tags:  कविता


तिन्हीसांज झाली तशी
सूर्य मालवून
हलके हलके सागर लाटा अंगावर घेत
ती संधीप्रकाशात बसली..
सारं कवटाळून... !


जराशाने.. तोही विझवून ..
मग तिने चंद्र उजळवून ठेवला..
सोबतीला असंख्य चांदण्या तेवत ठेवल्या


रात्रभर त्या मंद मंद प्रकाशात..
अगणित काळवंडलेली दु:ख
ती आंजारत गोंजारत राहिली..


अंधार पांघरुन निजू पाहताना
कधीतरी पहाट झाली.. तेव्हा
मध्यरात्रीच्या वेदनांनी
तिच्या पापण्या दव दव भिजल्या होत्या


पुन्हा हिरीरीने ती उठली...
तिने शांतपणे चंद्र विझवला..
चांदण्या उचलून ठेवल्या...
आणि
पूर्व क्षितीजावर सूर्य पेटवून
तिने सुरु केला ..
एक नवा कोरा दिवस...!


-अनुराधा म्हापणकर

Search by Tags:  कविता
Top

Anuradha Mhapankar's Blog

Blog Stats
  • 4186 hits